बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (11:18 IST)

राष्ट्रपतीही पाहणार ‘तलवार’ चित्रपट

सध्या सर्वत्र चर्चा आहे, ती आरुषी तलवार हत्याकांडावर आधारित ‘तलवार’ या सिनेमाची. अगदी तरुणांपासून वयोवृद्धांना भावणार्‍या या सिनेमाने अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. सिनेमाबद्दल होणारी चर्चा आणि लोकप्रियता लक्षात घेता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीसुद्धा हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांना थेट राष्ट्रपती भवनातून सिनेमाचे स्क्रीनिंग करण्याबाबत विचारणा केली गेली. त्यानुसार येत्या 25 ऑक्टोबरला सिनेमाच्या संपूर्ण टीमसह राष्ट्रपती हा सिनेमा बघणार असल्याचे समजते. 
 
एक सत्यकथा अत्यंत साध्या पद्धतीने या सिनेमात मांडली असून, समीक्षकांसह प्रेक्षकांनीसुद्धा सिनेमाला आपली पसंती दर्शविली. सिनेमात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, नीरज कबी, सोहम शाह यांच्या मुख्य भूमिका असून, विशाल भारद्वाज यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे स्क्रीनिंग झाले असून, तिथेही प्रेक्षकांनी सिनेमाचे कौतुक केले होते. आता राष्ट्रपतींनीही हा सिनेमा बघण्याची इच्छा व्यक्त केली असून, ‘तलवार’चे स्क्रीनिंग थेट राष्ट्रपती भवनात होणार आहे.