शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (18:17 IST)

घ्यावा अवतार हे बुद्ध देवा

buddha purnima
घ्यावा अवतार हे बुद्ध देवा ,
गरज आहे तुमची उद्द्धारण्या मानवा,
शिकवण तुमची कुठं लोपली नकळे?
कळतंय मानवास पण त्यांचे मन न वळे!
शांती चा पाठ तुमचा कुणी गिरवीत नाही,
घात करण्या परस्परांचा, कुणी मागे न पाही!
मूल्य जीवनातील चालले हरवत रे देवा,
म्हणून प्रार्थना तुजला, तुम्ही परत जन्म घ्यावा,
आणा जागेवर चक्र हे जीवनाचे,
मानवतेवर होतील उपकार तुमचे,
राजमहाल सोडुनी दावल निर्मोही मन,
बोधी वृक्षा खाली मिळविला बोधाचा मान,
आम्हांस ही द्यावा आशिष असाच काही,
उपयोगी पडो जीवन, परोपकारा पायी!
....अश्विनी थत्ते