Widgets Magazine
Widgets Magazine

हा तर शेरो-शायरींचा अर्थसंकल्प : राहुल गांधी

Last Modified बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (14:47 IST)
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला शेरो-शायरींचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आम्हाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारचा अर्थसंकल्प अतिशय किरकोळ आणि साधा फटाका निघाला, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त
केली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीविषयी सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांना समर्थन असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :