इंजिनिअरिंगमधली वेगळी वाट

Last Modified बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:33 IST)
विज्ञान शाखेतील बरीच मुले बारावीनंतर इंजिनिअरिंगकडे वळतात. मॅकेनिकल, कॉम्प्युटर, आयटी अशा
इंजिनिअरिंगच्या विविध शाखा प्रसिद्ध आहेत. मात्र, यासोबतच इतर काही शाखांचा विचारही तुम्ही करू शकता. त्यापैकी एक शाखा म्हणजे पेट्रोलियम इंजिनिअरिंग. या शाखेत नैसर्गिक वायू किंवा खनिज तेलाच्या उत्पादन प्रक्रियेबाबत शिकवले जाते. पेट्रोलियम इंजिनिअर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनांशी संबंधित क्षेत्रात कार्य करतात. भारतासह परदेशातही तुम्हाला संधी मिळू शकते.
पेट्रोलियम इंजिनिअरला फिजिक्स, केमिस्ट्री अशा विषयांसह इंजिनिअरिंग, जियोलॉजी आणि इकोनॉमिक्सचे ज्ञान असणे गरजेचे असते. सध्या जगभरात पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांचे साठे कसे पुरवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोलियम इंजिनिअर्सचे महत्त्व खूपच वाढले आहे. नैसर्गिक वायू, खनिज तेलांच्या नव्या साठ्यांचा शोध घेणे गरजेचे असते. यासाठी कुशल तज्ज्ञांची गरज असते. म्हणून पेट्रोलियम इंजिनिअर्सच्या मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग करायचे असेल तर या शाखेचा विचार करता येईल.
आरती देशपांडे


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा
आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैली मुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू ...

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल चमक
उन्हाळ्यात ऊन, धूळ,माती आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर आणि हातापायांवर ...

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव
एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट ...

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाही. व्यायामासह आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे