मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

घर बसल्या 80,000 रुपये पर्यंत कमवा, IRCTCची संधी साधून घ्या

आपल्या घरात इंटरनेटची सुविधा आहे आणि आपण बेरोजगार तर ही माहिती आपल्यासाठी आहे. आपण घरी बसल्या 80 हजार रुपये पर्यंत कमावू शकता. विशेष म्हणजे ही संधी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कार्पोरेशन (IRCTC) देत आहे. केवळ आपल्याकडे कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
 
आपण घरी बसल्या IRCTC चे अधिकृत एजेंट बनू शकता आणि कमावू शकता. एका रिपोर्टाप्रमाणे 55 टक्के रिझर्व्ह तिकिट ऑनलाईन बुक केले जातात. जर आपण IRCTC चे अधिकृत एजेंट आहात तर आपण तिकिट बुक करून कमिशनद्वारे कमाई करू शकता.  
 
आपण IRCTC चे एजेंट आहात तर आपण बल्कमध्ये तिकिट बुक करू शकता. या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी जनरल बुकिंग ओपन झाल्याच्या 15 मिनिटात आपल्याला तात्काळ तिकिट बुक करण्याचा पर्याय असतो. तिकिट रद्द करण्यात देखील कुठलीही समस्या येत नाही. आपणच रेल्वे, प्लेन आणि हॉटेलची बुकिंग देखील करू शकता. IRCTC एजंट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकाराच्या फ्लाईटची बुकिंग करू शकतात.
 
या प्रकारे बनू शकता एजंट
IRCTC एजंट बनण्यासाठी आपल्याला एक लायसेंस घ्यावं लागेल. जर आपण IRCTC चे एजंट बनू इच्छित असाल तर आपण एखाद्या अधिकृत प्रिंसिपल सर्व्हिस प्रोवाइडरसह भागीदारी करून एजंट बनू शकता. 
 
हे अमलात आणण्यासाठी दोन योजना आहेत. पहिली योजना 1 वर्षासाठी 3,999 रुपये आणि दुसरी योजना दोन वर्षांसाठी 6,999 रुपये या प्रकारे आहे. 
 
आपण दर महिन्याला अधिकात अधिक 100 तिकिट बुक करू शकता आणि प्रत्येक तिकिटावर 10 रुपये बुकिंग चार्ज देय असेल. तसेच आपण 101 ते 300 तिकिट बुक करत असाल तर जार्च म्हणून 8 रुपये आणि 300 हून अधिक तिकिट बुक केल्यावर हा चार्ज 5 रुपये असतो अर्थात अधिक तिकिट बुक केल्यास आपला अधिक फायदा होईल. तसेच आपण स्लीपर आणि सेकंद सीटिंगचे तिकिट बुक करत असाल तर आपल्याला 20 रुपये प्रति पीएनआर आणि एसीच्या कोणत्याही श्रेणीसाठी तिकिटावर 40 रुपये प्रति पीएनआर कमिशन मिळेल. या प्रकारे आपण दर महिन्याला 2 हजार एसी तिकिट बुक करू शकता आणि असे झाले तर आपण 80 हजार रुपये पर्यंत कमावू शकता.