शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (09:33 IST)

IGNOU Admission 2020 : प्रवेश आणि री रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली

इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिवर्सिटी (इग्नू)ने पुन्हा एकदा जुलै 2020 सत्रासाठी प्रवेश आणि पुन्हा नोंदणीसाठीची शेवटची मुदत पुढे वाढविली आहे. आता विद्यार्थी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात.
 
ऑनलाईन अभ्यासक्रम आणि ओडीएल अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख देखील 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या पूर्वी ही शेवटची तारीख 15 सप्टेंबर होती. 
 
विद्यार्थी ignou.ac.in या संकेत स्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 
 
विद्यार्थी इग्नूच्या विविध पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, प्रमाणपत्र, पीजी प्रमाणपत्र, अवेयरनेस कोर्सेजसाठी अर्ज करू शकतात.
 
विद्यार्थी इग्नूच्या प्रवेश पोर्टल ignouadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन देखील अर्ज करू शकता.
 
IGNOU July 2020 admission: अर्ज असा करावा.

1 सर्वप्रथम इग्नूच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा वेबसाईट ignou.ac.in वर क्लिक करा.
 
2 होमपेजवर रिरजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
 
3 सूचना वाचा आणि “Proceed for re-registration” लिंकवर क्लिक करा.
 
4 प्रथमच नोंदणी करीत असल्यास “New registration” लिंक वर क्लिक करा.
 
5 नोंदणी करा आणि संपूर्ण माहिती द्या.
 
6 आता नोंदणी फी देऊन जमा करा.
 
विद्यार्थी सेवा केंद्र "
इग्नू संपर्क फॉर्म - ईमेल: [email protected]
दूरध्वनी क्रमांक - 011-29572513, 29572514
 
विद्यार्थी नोंदणी विभाग:
ईमेल: [email protected]
 
दूरध्वनी क्रमांक - 011-29571301, 29571528