शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (21:41 IST)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra Public Service Commission Competitive Exam Schedule Announced
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वर्ष २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते.
 
त्यानुसार वर्ष २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल.
 
या गृहीतकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.
 
जाहिरत केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षांचा समावेश आहे.