गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (21:30 IST)

कॉम्प्युटर हार्डवेयर -तांत्रिक ज्ञानासह करिअर बनवा

भारतासह जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर किंवा संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे
 
.कॉम्प्युटर किंवा संगणक आता मानवांनी केलेली कामे करीत आहेत. मग ते सार्वजनिक क्षेत्रातील असो किंवा खाजगी क्षेत्रातली असो किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असो. त्याच्या वाढत्या कलमुळे तरुणांसाठी करिअरच्या संधीही उजळल्या आहेत.
 
 
कमी शैक्षणिक पात्रता असलेला असो किंवा पदवीधारी व्यक्ती असो कॉम्प्युटरचा ज्ञान असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रोजगाराच्या संधी आहेत.
 
कॉम्प्युटर एक मशीन आहे.याचे भाग जसे की की-बोर्ड,चिप,हार्डडिस्क,मॉनिटर,सर्किटबोर्ड्स,यांना हार्डवेयर म्हणतात.जे तज्ञ त्यांची देखभाल करतात आणि दुरुस्ती करतात त्यांना हार्डवेयर इंजिनियर म्हणतात.
 
या अंतर्गत कॉम्प्युटरच्या भागाची दुरुस्ती करणे,कॉम्प्युटरला बनवणे,नेटवर्क तयार करण्या सारखे कार्य येतात.
 
ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेयर इंस्टाल करणे देखील कॉम्प्युटर हार्डवेयर च्या अंतर्गत येते.कॉम्प्युटर हार्डवेयर चे कोर्स करून तरुण वर्ग या क्षेत्रात आपले करिअर   करू शकतात.  
 
 
हे कोर्स केल्यावर कंपन्यांमध्ये किंवा कॉम्प्युटर हार्डवेयरचा खासगी व्यवसाय देखील सुरु करू शकता.कॉम्प्युटर हार्डवेयरचे लघु आणि दीर्घकालीन कोर्स करू शकता.हे कोर्स करण्यासाठी लागणारी पात्रता बारावी उत्तीर्ण असावे.पदवीधर असलेले तरुण देखील याचे लॉंग टर्मचे कोर्स करू शकतात. 
 
 
कॉम्प्युटर हार्डवेयरच्या प्रशिक्षणात कॉम्प्युटरचे पार्टस सीडीरॉम, हार्डडिस्क, मदरबोर्ड,की बोर्ड,माउस सुधारण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
 
 
कॉम्प्युटर हार्डवेयर मध्ये वेतनमान पात्रता आणि कौशल्यावर अवलंबवून असते. कॉम्प्युटर हार्डवेयर मध्ये चांगले प्राविण्य मिळाल्यावर आपण 15 ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळवू शकता.कॉम्प्युटर हार्डवेयरचा कोर्स केल्यावर आपण स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकता.