गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (16:44 IST)

Children’s Day Wishes बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पाखरांची चपळता,
प्रात:काळाची सौम्य उज्ज्वलता
नि झऱ्याचा खळखळाट
म्हणजे मुले...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच
तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या
लहान बाळाला सुद्धा
बालदिनाच्या खूप शुभेच्छा!
 
वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
 
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, 
ते सर्वकाही करू शकतात. 
अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा
 
चला आपल्या जगातील 
या चिमुकल्यांच्या आनंदासाठी 
एक सुरक्षित जग बनवूया. 
बालदिनाच्या शुभेच्छा
 
ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,
थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.
असं होतं बालपण,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…
प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…
आनंदी राहा आणि आठवणी जपा…
बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.
 
मुलांमध्ये दिसतो देव, 
चला देवाची ही कलाकृती साजरी करूया
बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा
 
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाही
तर आनंदी राहण्यासाठी
ज्यामुळे त्यांना कळेल 
वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलेच नाही..
आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,
मला पुन्हा लहान व्हायचंय…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!