शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (08:46 IST)

राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात गुरुवारी देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.