1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (09:00 IST)

बरे झाले ११ हजार ३९१ तर ८४९३ नवीन रुग्णांचे निदान, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी

11 thousand 391 and 8493 new patients diagnosed
राज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५  हजार २६८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. रविवारपेक्षा सोमवारी राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सोमवारी २२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.