बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (09:24 IST)

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांवर कायम

राज्यात बुधवारी ९०११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी १३ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ०९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात बुधवारी ३४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.