गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (21:28 IST)

महाराष्ट्रात १४ डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी

देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३२९ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने  केला आहे. आयएमएच्या माहितीनुसार, बिहारमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला असून त्यांना दिल्लीचा दुसरा नंबर आहे. तसेच महाराष्ट्रात १४ डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान आयएमएच्या या दाव्याचा आरोग्य विभागाकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही आहे.
 
आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे.ए. जयलाल म्हणाले की, ‘हा आकडा असोसिएशनच्या शाखेद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जारी केला गेला आहे.’ यापूर्वी १८ मेला आयएमएने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील २६९ डॉक्टरांचा जीव गेल्याचे सांगितले होते. 
 
‘या’ राज्यांमध्ये डॉक्टरांचा कोरोनामुळे अधिक मृत्यू
राज्य            मृत्यूची संख्या
बिहार                ८०
दिल्ली               ७३
उत्तर प्रदेश          ४१
आंध्र प्रदेश           २२
पश्चिम बंगाल       १५
महाराष्ट्र              १४
ओडिसा             १४