शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 22 एप्रिल 2020 (06:58 IST)

रुबी हॉलच्या 25 जणांना कोरोना

25 hospital staff
पुण्यातील कोरोना व्हारसचा फास दिवसेंदिवस अधिकाधिक आवळला जात आहे. नागरिकांबरोबरच पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनिकच्या 3 डॉक्टर, 16 नर्सेस आणि सहा कर्मचारी अशा 25 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे तर पोलीस दलातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पुण्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा 800 पेक्षा जास्त झाल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.