1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (18:28 IST)

देशासमोर धोक्याची घंटा, कोरोनाग्रस्तांची संख्या २९८

confirmed cases of coronavirus
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २५८ वर होती. यामध्ये मोठी वाढ झाली आहे.  जगभरात आतापर्यंत ११ हजाराच्या वर कोरोनामुळे बळी गेले असून भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झालेला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
 
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर गेलेली आहे. तर एकाचा मृत्यू झालेला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आज ४० ने वाढली असून आकडा २९८ वर पोहोचला आहे. यामध्ये ३९ जण परदेशी नागरिक आहेत.