शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (08:06 IST)

राज्यातील 50.70 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 44,493 जणांना डिस्चार्ज

50.70 lakh patients
राज्यातील कोरोना रुग्णांची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे‌. राज्यात शुक्रवारी 44 हजार 493 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णापैकी 50 लाख 70 हजार 801 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.  
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज दिवसभरात 29 हजार 644 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाख 27 हजार 092 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या राज्यात 3 लाख 67 हजार 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
 
राज्यात  शुक्रवारी  555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 86 हजार 618 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.57 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 91.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 41 हजार 776 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.04 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 27 लाख 94 हजार 457 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 20 हजार 946 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.