सोमवार, 15 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 9 मे 2020 (14:03 IST)

गरिबांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरावेत : राहुल

7500 should
गरिबांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये जमा करावेत अशीही मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी 65 हजार कोटींची गरज आहे असंही राहुल यांनी म्हटलं आहे. लॉकडाउन उठवण्यासाठी मोदी सरकारने आता योग्य नियोजन करावं असंही राहुल यांनी म्हटलं  आहे. स्थलांतरित मजुरांसाठी वेगळी उपाय योजना करा, या सगळ्यांना आज मदत करण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशावेळी गरीबांना, मजुरांना, लघु आणि मध्य उद्योजकांना आज मदत करायला हवी असंही राहुल यांनी म्हटलं आहे. 
 
पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्याची वेळ ही कोणतंही राजकारण करण्याची नाही किंवा कोणतीही टीका करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटाशी सगळा देश लढतो आहे. या संकटातून बाहेर पडणं आणि त्यापाठोपाठ अर्थव्यवस्थेचा समतोल राखणं आवश्यक आहे. देशापुढे जे संकट आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत असंही राहुल यांनी स्पष्ट केले.