शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 23 जून 2021 (17:52 IST)

खरी कोरोना योद्धा,लसीकरणासाठी एका आईचा संघर्ष

कोरोना विषाणूशी आज सर्व देश लढा घेत आहे.या कोरोनामध्ये कित्येक जण बळी गेले आहे.कित्येकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वे आपापल्यापरीने प्रयत्न करत आहे. रुग्णालयात डॉक्टर,नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी आपले जीव धोक्यात टाकून कोरोनारुग्णांची सेवा-सुश्रुषा करीत आहे.हे सर्व कोरोना योद्धाच आहे.जे रुग्णांना वाचविण्यासाठी दिवसं रात्र रुग्णांची सेवा करीत आहे.
 


सध्या असाच एक कोरोना योद्धाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये एक नर्स आपल्या लहानग्या बाळाला पाठीवर घेऊन अतिशय धोकादायक पद्धतीने नदी ओलांडून काही दुर्गम क्षेत्रात लसीकरणकरण्यासाठी जात असताना दिसत आहे.या फोटोमध्ये तिच्या खांद्यावर लसीचे कंटेनर दिसत आहे.तर पाठीवर तिने बाळाला घेतले आहे.आणि ती दुर्गम भागातील गावात लोकांच्या लसीकरणासाठी जात आहे.या कोरोना योद्ध्याचे नाव मानती कुमारी असून त्या झारखंड राज्याची रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे.