बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला असल्यामुळे एका खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार घेत असल्यावरही तब्येत बरी झाली नाही तेव्हा त्याला पुण्यातील ससून रूग्णालयात आणि नंतर नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासणीत त्याला करोनाची लागण असल्याचं स्पष्ट झाले.
चिंतेची बाब म्हणजे या रिक्षाचलकाने बारामतीमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये विविध ठिकाणी प्रवास केला असून अनेकांच्या तो संपर्कातही आला होता. दररोज शेकडो प्रवाशांची त्याने नेआण केली होती. बारामती शहरातील श्रीरामनगर हे केंद्र धरुन 3 किमी परिसर कॉरनटाईन झोन म्हणून व तेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या रिक्षाचालकामुळे बारामतीमधील अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.