शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (10:02 IST)

पाहिला का, आवड होती म्हणून बनवला चांदीचा मास्क

कोरोनाबरोबर जगायचे असले तरी आता लग्नकार्यात देखील मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे काहीनी कोरोनाची संधी बघून वेगवेगळे मास्क तयार केले आहेत. आता काही सुवर्णकारांनी देखील शक्कल लढविली आहे. यात कोल्हापूर येतील एका सुवर्णकाराने चांदीचा मास्क बनविले.  सध्या ६० ग्रॅम वजनाच्या चांदीत हा मास्क बनवण्यात आला आहे. 
 
रत्नागिरीतील मांडवी येथे राहणारे शेखर यशवंत सुर्वे यांनी खास कोल्हापूर येथून हा चांदीचा मास्क तयार करुन घेतला आहे. याबाबत माहिती देताना शेखर सुर्वे यांनी सांगितले की एक आवड म्हणून हा मास्क घेतला आहे. तो ६० ग्रामचा असून त्याची किंमत ३९०० रुपये आहे. मी एक फोटो मोबाईलवर पाहिला होता. तसा मास्क मला हवा आहे म्हणून माझ्या ज्वेलर्सला दाखविले. त्यांनी तो कोल्हापूरहून मागवून घेतला असे त्यांनी स्पष्ट केले.