1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 22 मार्च 2021 (19:16 IST)

नागपुरात कोरोनाचे थैमान ,24 तासात 40 मृत्युमुखी

corona in Nagpur
नागपूर महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने पसरत आहे. नागपूर शहरात गेल्या 24 तासात  3 हजार 596 प्रकरणे सामोरी आले आहेत. तर 40 लोक मृत्यूमुखी झाले आहेत. 
 
नागपुरातील सिव्हिल सर्जनच्या म्हणण्यानुसार, नागपुरातील एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 96 हजार 676 वर गेली आहे, तर आतापर्यंत 1 लाख 60 हजार 945 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 31 हजार 67 झाली आहे.,तर आतापर्यंत 4664 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर देखील कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्या मुळे चिंताजनक स्थिती बनलेली आहे. नागपुरात कोरोनावर नियंत्रण कसे आणावे हे प्रशासनासमोर मोठे आव्हानच  झाले आहे.