मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:43 IST)

काय म्हणता, मृत व्यक्तीच्या मृतदेहामुळे इतरांमध्ये कोरोना संसर्ग

Corona infection
थायलंडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या मृत व्यक्तीच्या मृतदेहामुळे इतरांमध्ये संसर्ग पसरल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्याला संसर्ग झाला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बँकॉकच्या वैज्ञानिकांनी जर्नल ऑफ फोरेंसिक कायदेशीर औषध अभ्यासात या बाबतची माहिती दिली. हे संशोधन बँकॉकमधील आरव्हीटी मेडिकल सेंटरच्या वॉन श्रीविजीतालाई आणि चीनच्या हेनान मेडिकल युनिव्हर्सिटीच्या विरोज वायवानिटकिट यांनी केलं आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना संक्रमित जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या मृतदेहाच्या संपर्कात येण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान केली पाहिजेत.

तज्ञांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजेत. रुग्णालयातून मृतदेह काळजीपूर्वक अंत्यसंस्कारासाठी पाठवा. श्रीलंकेच्या सरकारनेही मृतदेहाद्वारे होणार्‍या संसर्गाचा धोका लक्षात घेता मुस्लिम लोकांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून सर्व मृतदेह जाळण्याचे आदेश दिले आहेत.