शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:28 IST)

कोरोनाची ऑनलाइन चाचणी शक्य

Corona
सध्या कोरोना टेस्ट किटची मागणी झपाट्याने वाढत असताना प्रॅक्टोने जाहीर केले आहे की कोविड -१९ ची चाचणी घेण्यासाठी आपण ऑनलाइन चाचणी बुक करू शकता. कंपनीने यासाठी थायरोकेअर सोबत भागीदारी केली आहे.
 
बंगळुरू स्थित या कंपनीने म्हटले आहे की, कोविड -१९ चाचणी थायरोकेयरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असून भारत सरकारकडून त्यास मान्यता देण्यात आली आहे. यासह इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरनेही त्याला मान्यता दिली आहे.
 
प्रॅक्टोने म्हटले आहे की, 'सध्या मुंबईकरांसाठी चाचणी ऑनलाईन उपलब्ध असून लवकरच ती संपूर्ण देशासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी, डॉक्टरांनच्या वैध प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असेल आणि फिशियन्सची सही फॉर्म भरावा लागेल. चाचणी दरम्यान फोटो आयडी कार्ड देखील आवश्यक असेल.
 
कोविड -१९ ची चाचणी वेबसाईटवरुन बुक करता येऊ शकते. यासाठी ४५०० रुपये फी लागेल. बुकिंग केल्यानंतर, रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी प्रतिनिधींना घरी पाठवले जाईल.
 
नमुने संकलनासाठी पाठविलेले प्रतिनिधी आयसीएमआरने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करतील असे कंपनीने म्हटले आहे. चाचणीसाठी स्वॅब व्हायरल ट्रान्सपोर्ट माध्यमाद्वारे रक्त गोळा केले जाईल. कोविड -१९ चाचणीसाठी घेतलेलं रक्त थायरोकेअर प्रयोगशाळेत पाठविले जाईल.