शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2020 (07:44 IST)

पाहिली का कोरोना व्हायरससारखी हुबेहूब मिठाई

कोलकातामधील एका मिठाईवाला कोरोना व्हायरससारखी हुबेहूब मिठाई बनवून विकत आहेत. बंगालच्या एका महिलेने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना व्हायरसच्या मिठाईचा फोटो शेअर केला आहे.
 
हा फोटो शेअर तिने असं लिहिलं की, कोणी आपल्या मुलाचे नाव कोरोना आणि कोविड असं ठेवतं आहे. तर बंगालचा हा मिठाईवाला कोरोना व्हायरससारख्या मिठाई बनवून विक्री करत आहे. क्रेजी लोक. या फोटोवर अनेक लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
विशेष म्हणजे, कोलकतामध्ये लॉगडाऊनमुळे मिठाईची दुकाने फक्त चार तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना पश्चिम बंगाल व्यापार समितीने मिठाईची दुकाने सुरू ठेवण्याची विनंती केली होती. त्यानंतर सरकारने दररोज फक्त चार तास मिठाईची दुकाने सुरू राहतील अशी अट घातली. पीटीआयच्या वृत्तानुसार मिठाईची दुकाने दुपारी १२ ते संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहतील, असं सांगण्यात आलं होत.