1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (08:57 IST)

अशी आहे कोरोनाची भीती, रस्त्यावर पडलेल्या नोटा कोणीही उचलत नाही

fear of coronavirus
दिल्लीच्या बुद्ध विहार भागात अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्यावर २ हजारांच्या नोटा पडल्या होत्या. पण कोणी उचलण्याचूी हिंमत देखील केली नाही. २ हजाराच्या ७ नोटा रस्त्यावर पडल्याचं अनेकांनी पाहून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 
 
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये नोटांना थुंकी लावून टाकण्यात आल्याचं दिसत होतं. त्यामुळे आजच्या घटनेत लोकांनी या नोटा उचलण्याचं धाडस केलं नाही.
 
बराच वेळ गोंधळ चालल्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या नोटांवर दगडं ठेवली. त्यानंतर एक व्यक्ती काही वेळेत तेथे आला आणि त्याने त्याच्या खिशातून हे पैसे पडल्याचं सांगितलं. या व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले होते. पण खिशात ठेवताना त्या नोटा त्याच्या खिशातून खाली पडल्या. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ७ नोटा त्या व्यक्तीला दिल्या.