मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (10:00 IST)

दिलासादायक बातमी ! आता कोरोनाशी संबंधित कोणत्याही कामासाठी आधार कार्डाची गरज नाही -यूआयडीएआय

Good news! Aadhaar card is no longer required for any work related to Corona - UIDAI
नवी दिल्ली. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) शनिवारी सांगितले की, आधार कार्ड नसल्यामुळे कोणालाही लसी देणे,औषधे देणे, रुग्णालयात दाखल करणे किंवा उपचार देण्यासाठी  कोणालाही नाकारता येणार नाही.त्यांच्या कडे आधार कार्ड नसल्यास कोणत्याही आवश्यक सेवा देण्यास नकार देता येणार नाही. असे यात स्पष्ट केले. देशातील कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेमध्ये यूआयडीएआयचे विधान महत्त्वपूर्ण आहे.
यूआईडीएआईने एका निवेदनात म्हटले आहे की, 12-अंकी बायोमेट्रिक आयडी नसतानाही सेवा आणि लाभ देण्याची खात्री करण्यासाठी आधार प्रकरणात एक सुप्रसिद्ध अपवाद आहे. त्यात म्हटले आहे की जर एखाद्या नागरिकाकडे कोणत्याही कारणास्तव आधार कार्ड नसेल तर त्याला आधार कायद्यानुसार सेवेस नकार देता येणार नाही.
आधार कार्ड नसल्यामुळे अनेकांना हॉस्पिटलायझेशनसारख्या अत्यावश्यक सेवा नाकारल्या जात असल्याच्या या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने स्पष्ट केले की आधार नसल्यास कोणालाही लस, औषधे दिली जात नाहीत, रुग्णालयात दाखल करणे किंवा उपचार देण्यास नकार देता येणार नाही.