1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (22:40 IST)

चांगली बातमी! तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक नाही-आरोग्य मंत्रालय

Good news! The third wave is not dangerous for children - the Ministry of Health corona virus news in marathi webdunia marathi
मुलांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी भीतीची परिस्थिती आहे,विशेषत: कोविड -19 संसर्गाच्या तिसऱ्या लाटा विषयी.परंतु बुधवारी,आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले की मुलं असिम्प्टोमॅटिक असतात आणि क्वचितच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक प्राणघातक ठरली आहे. या लाटेत कोरोना पॉझिटिव्ह मुलांची संख्याही दिसून आली. मुलांवर या विषाणूच्या प्रतिकूल परिणामाशी संबंधित अनेक प्रश्न माध्यमांमध्ये उपस्थित झाले आहेत.
 
आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की कोरोनाच्या लहरीचा मुलांवर फारसा परिणाम होत नाही. ज्या मुलांमध्ये कोरोना होत आहे ते बहुतेक असिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजेच त्यांच्यात या संसर्गाची लक्षणे फारच कमी असतात. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कधीकधी संसर्ग झालेल्या फारच कमी मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की पूर्णपणे निरोगी मुलांनाही हा संसर्ग झाल्यास त्यांचे आरोग्य सौम्य खराब होते आणि ते रुग्णालयात न जाताच लवकर बरे होतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटा दरम्यान, ज्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडली. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता होती, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 
 
सरकारने असे स्पष्ट केले आहे की भारतात किंवा संपूर्ण जगात असे कोणतेही डेटा उपलब्ध नाहीत ज्यामध्ये असे दिसून आले आहे की मुलांमध्ये हा संसर्ग गंभीरपणे पसरला आहे. सरकारच्या वतीने असे म्हटले जाते की मुलांची काळजी पाहता हेल्थ केयर इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. या संसर्गामुळे संक्रमित मुलांची काळजी व उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.कोवॅक्सीन ची चाचणी 2-18 वर्ष वयोगटातील मुलांवर सुरू केली गेली आहे.असे ही सांगण्यात आले आहे.