1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : गुरूवार, 11 मार्च 2021 (15:39 IST)

महाराष्ट्रात 15 दिवसांत संक्रमणाचा वेग दुप्पट

rate of corona cases
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात जागोजागी कडक निर्बंध लागू केले जात आहे. दरम्यान, नागपूर प्रशासनाने 15 ते 21 मार्च दरम्यान लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. आदल्या दिवशी येथे कोरोनाचे 1800 हून अधिक रुग्ण आढळले. त्याचबरोबर, गेल्या एका आठवड्यापासून येथे सरासरी एक हजार रुग्ण आढळले आहेत. म्हणूनच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सुविधांना सूट देण्यात येईल.
 
दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 13,659 नवीन रुग्ण आढळले. 7 ऑक्टोबरनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यानंतर 14,578 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वीपर्यंत येथे 5-6 हजार प्रकरणे येत होती. देशात सध्या 60% हून अधिक रुग्ण येथे येत आहेत.
 
गेल्या 24 तासांत देशात 21,814 नवीन रूग्णांची ओळख पटली असून त्यापैकी 17,674 रुग्ण बरे झाले. या साथीच्या आजारामुळे 114 लोकांचे प्राण गमावले. अशा प्रकारे, सक्रिय प्रकरणांची संख्या, म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,020 ने वाढली. 
 
राज्यात आतापर्यंत 22 लाख 52 हजार 57 लोकांना लागण झाली आहे. यापैकी 20 लाख 99 हजार 207 लोक बरे झाले आहेत, तर 52,610 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 99,008 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 3 जिल्हे पुणे, नागपूर आणि मुंबई येथून गेल्या 24 तासात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
 
covid19india.org याहून प्राप्त आकड्यानुसार आतापर्यंत एकूण 1.12 कोटी लोकांना या आजाराने ग्रासले आहे. त्यापैकी 1.09 कोटी बरे झाले आहेत तर 1.58 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जेव्हाकी 1.85 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.