1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:44 IST)

भारताच्या शेजारच्या या '३' देशांत कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू नाही

corona free countries
कोरोना विषाणूमुळे भारतात मृतांचा आकडा एक हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र भारता शेजारचे तीन  देश असे आहेत जिथे कोरोनामुळे एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
 
भारताचे 3 शेजारी देश असलेले नेपाळ, भूतान आणि मालदीव हे जगातील अशा काही देशांमध्ये आहेत जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये कोरोनाची 250 प्रकरणे समोर आली आहेत. परंतु एकाचा ही येथे मृत्यू झालेला नाही.
 
नेपाळमध्येही कोरोनाचे 54 रुग्ण आढळले आहेत. परंतु अद्याप येथे कोणाच्या ही मृत्यूची माहिती समोर आलेली नाही. भूतानमध्ये कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहेत. 
 
बांगलादेशात कोरोनाचे 7,103 रुग्ण आढळले आहेत ज्यात 163 मरण पावले आहेत. सार्क देशांपैकी सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तान (327) आणि बांगलादेश (163) यांचा क्रमांक आहे. अफगाणिस्तानात, 1,828 लोकांना कोरोना झाला असून 58 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. श्रीलंकेत कोरोनाचे 622 रुग्ण आढळले असून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.