1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (11:15 IST)

Johnson & Johnson चा कोरोनावर लस शोधण्याचा दावा?

Johnson & Johnson to begin human trial of COVID-19 vaccine in July
करोना व्हायरसवर औषध शोधण्याचे प्रयत्न सुरु असताना एका प्रसिद्ध कंपनी Johnson & Johnson ने यावर लस शोधल्याचा दावा केला आहे. कंपनीप्रमाणे या व्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून आता मानवावर चाचणी घेण्यास सुरूवात करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
कंपनी जुलै महिन्यामध्ये माणसावर या व्हॅक्सिनच्या चाचणीला सुरूवात करणार आहे. हे व्हॅक्सिन करोनावर 100 टक्के उपायकारक ठरेल असा अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. पण, त्याआधीच अमेरिकेने Johnson & Johnson सोबत या व्हॅक्सिनसाठी करार केला आहे. या करारानुसार कंपनी अमेरिकेसाठी या व्हॅक्सिनचे 1 बिलियन डोस तयार करणार आहे. 
 
Johnson & Johnson कंपनी जुलै महिन्यामध्ये या व्हॅक्सिनच्या माणसावरील चाचणीला सुरूवात करेल. कंपनी हा प्रयोग अमेरिका आणि बेल्जियममध्ये करणार आहे. यासाठी कंपनीने 18 ते 65 या वयोगटातील 1,045 जणांची निवड केली आहे. वृद्धांवर हे व्हॅक्सिन परिणामकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी 1045 जणांमध्ये काही 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे.
 
अमेरिकेची Moderna Inc ही बायोटेक कंपनीही व्हॅक्सिन बनवण्यामध्ये पुढे आहे. करोनाच्या 600 रुग्णांवर कंपनीने आपल्या व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. रुग्णांवर याचा काय परिणाम होतो त्याचा अभ्यास कंपनीकडून सुरू आहे. करोना व्हॅक्सिन बनवण्यामध्ये एस्ट्राजेनेका, सनोफी, फाइजर आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांसारख्या कंपन्याही आहेत. या कंपन्यांच्या व्हॅक्सिनची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. जगभरात सध्या जवळपास 10 व्हॅक्सिनची मानवावर चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांप्रमाणे सुरक्षित आणि परिणामकारक व्हॅक्सिन येण्यास ट्रायल सुरू झाल्यानंतर साधारणपणे 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो.