1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (08:02 IST)

राज्यात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम, नोंदवला आतापर्यंतचा उच्चांक

New record
राज्यात मंगळवारी कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली.  राज्यात एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून घेतली. आतापर्यंतचा हा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. 
 
एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांनी कोरोना लस घेतल्याने आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. 
 
दिवसभरात 5 लाख 52 हजार 909 नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.