1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (12:41 IST)

दातदुखीमुळे झाले ओमिक्रोनचे निदान

Omicron
एक 12 वर्षाची मुलगी 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियाहून पिंपरी चिंचवडला परतली होती. यानंतर तिला दातदुखीचा त्रास सुरू झाला. त्यासाठी तिने एका डेन्टिस्टची अपॉइन्टमेंट घेतली होती, मात्र, कोरोनाच्या नियमांनुसार डॉक्टरने या मुलीची आरटी-पीसीआर टेस्ट करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या चाचणीमुळे मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तिच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करण्यात आली. पहिल्या कोरोना टेस्टमध्ये कुटुंबातील चौघांचा रिपोर्ट नकारात्मक आला. मा‍त्र, दुसरी टेस्ट केल्यानंतर या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन झाले. यानंतर सर्वांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकार्‍याने स्पष्ट केले.