1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जुलै 2020 (10:08 IST)

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

राज्यात बुधवारी ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.