पोलीस दलाला आर्सेनिक आल्बम ३०चा डोस
लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलावरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दल मागवण्याबरोबरच पोलिसांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गृह विभागाच्यामार्फत सुरु झाला आहे. आयुष मंत्रालय व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील पोलिसांना आर्सेनिक आल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालय व पोलीस सर्जन डॉ. एम. एम. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या घडीला सुमारे एक लाख गोळ्यांचे मोफत वाटप झाले आहे. यामध्ये पोलीस रुग्णालयातील मानद डॉक्टर या पदावर कार्यरत असलेले डॉ. राहुल जोशी व डॉ. रवी हे होमिओपॅथिक कंपन्या व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या १ लाख ७० हजार गोळ्यांचे विनामूल्य वाटप करीत आहेत.