बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (16:02 IST)

रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात येणार आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे रामदास आठवले यांचे आवाहन केले आहे. रामदास आठवलेंना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात जे उपस्थित होते, त्यांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन रिपाइंकडून करण्यात आलं आहे. 
 
सोमवारी रामदास आठवलेंच्या आरपीआयमध्ये पायल घोषने प्रवेश केला आहे. यावेळी रामदास आठवले अनेकांच्या संपर्कात आले. पायल घोष देखील आता क्वारंटाईन आहे. पायल घोषने फिल्ममेकर अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. सोमवारी पायल घोष आरपीआयची सदस्य झाली.