शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 22 मार्च 2020 (11:09 IST)

Janata Curfew : रामदेव बाबांनी सांगितलं, या काळात घरी बसून हे करा...

Ramdev Baba
आज देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यास सुरूवात झाली असून लोकांना प्रश्‍न पडतं आहे की या दरम्यान वेळ कसा घालवायचा तर या काळात तुम्ही काय करू शकता या बद्दल योगगुरू रामदेव बाबांनी सल्ला दिला आहे.
 
रामदेव बाबा यांनी यासंदर्भात एक टि्वट केलंय. त्यांनी म्हटलंय की, आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र यांचा संकल्प पूर्ण करू या. भारताला करोनापासून वाचवू. साधना, सावधगिरी, संयम आणि संकल्प. सर्वांनी घरी स्वाध्याय, योग, आसन, प्राणायाम, ध्यान आणि सत्संग करा. बाहेर जाऊ नका, स्वत:च्या आत जा. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाटेच ट्विट करून यात सर्वांनी सहभागी होण्याच आवाहन केलं आहे.