रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (12:59 IST)

Reliance चं कोरोनासाठी पहिलं डेडिकेटेड हॉस्पिटल, मदतीचं आणखी पावलं

कोरोना व्हायरसशी जंग लढण्यासाठी रिलायंस इंडस्ट्रीजने मदतीचं हात पुढे केला आहे. कंपनीने महामारीशी सुरू असलेल्या या लढाईत आपली भूमिका स्पष्ट करत विस्तृत प्लान समोर आखला आहे. यात रिलायंस ग्रुपच्या सर्व कंपन्या रिलायंस फाउंडेशन, रिलायंस रिटेल, जिओ, रिलायंस लाईफ साइंसेजची भूमिका निर्धारित करण्यात आली आहे.
 
कोरोना डेडिकेटेड हॉस्पिटल
कंपनीने देशातील पहिलं कोविड-19 अर्थात कोरोना संक्रमित रुग्णांसाठी एक डेडिकेटेड हॉस्पिटल तयार केले आहे. बीएमसी सोबत मिळून हे रुग्णालय 7 हिल्स हॉस्पिटल, मुंबईत तयार केलं गेलं आहे. कोरोनाला लक्षात घेत येथे आवश्यक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर जसे वेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलिसिस मशीन आणि पेशेंट मॉनिटरिंग डिव्हासेज आहेत.
 
या व्यतिरिक्त आयसोलेशन वार्ड तयार केले गेले आहे जेणेकरून संशयित लोकांना ठेवता येईल.
 
हेल्थ वर्कर्स
या व्यतिरिक्त कंपनीने फेसमास्कची उत्पादन क्षमता वाढवून 1 लाख केली आहे. तसेच हेल्थ वर्कर्ससाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स जसे सूट, कपडे इतर गरजांचं प्रॉडक्शन करण्यावर कार्य करत आहे. 
 
कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन
स्थायी आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन देण्याची घोषणा करण्यात आलं आहे. सोबतच कंपनी कोरोना व्हायरसने पीडित रुग्णाला नेण्यासाठी व्हीकलचा इंधन खर्च देखील उचलणार. 
 
उघडले राहतील रिलायंस रीटेल स्टोअर
प्रत्येक दिवशी 7 ते 11 वाजेपर्यंत रिलायंस रीटेल उघडले जातील सोबतच ज्यांची आजीविका महामारीमुळे प्रभावित होत आहे त्यांना रिलायंस फाउंडेशनकडून मोफत जेवायला दिलं जाईल.