शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (19:39 IST)

लातूर मध्ये 8 ते 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊन

Strict lockdown from May 8 to 13 in Latur
लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटना लक्षात घेता शनिवारी 8मे पासून सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी 7 वाजता लॉकडाऊन सुरू होईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद राहतील 
 
“कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन राबविण्याचा निर्णय घेतला आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे लॉक डाऊन 13 मे पर्यंत लागू राहील. 
 
गुरुवारी लातूरमध्ये कोविड -19 चे 1195 नवीन रुग्ण आढळले आणि एकूण संक्रमितांची संख्या 78,090आहे. या महामारीमुळे आतापर्यंत लातूरमध्ये 1467 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या प्राणघातक विषाणूमुळे 65,015 लोक बरे झाले आहेत. लातूरमध्ये सध्या कोरोना विषाणूबाधित 11,608 रूग्ण उपचाराधीन आहेत.