1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (10:37 IST)

मुलांना कोरोना होऊन गेला तरी त्यांना कळलं नाही

The children became
नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. लहान मुलांच्या स्क्रिनिंगमध्ये 12 मुलांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या मुलांना कोरोना होऊन गेला तरी त्यांना कळलं नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे कोरोनाची अधिक भीती बाळगण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे. 
 
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली. नागपुरातील मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात लहान मुलांसाठी ही क्लिनिकल ट्रायल सुरू होती. त्यावेळी 6 ते 12 या वयोगटातील 35 पैकी 12 मुलांमध्ये अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. घरात कोणतीही कोरोनाची पार्श्वभूमी नसताना 12 मुलांमध्ये अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यावरून या मुलांना न कळत कोरोना होऊन गेल्याचं स्पष्ट होत आहे.