रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)

कोरोना बाधितांपेक्षा मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

The number of freed patients
महाराष्ट्रात सलग तिसऱ्यादिवशी कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात बुधवारी १४ हजार ५७८ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. तर ३५५ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. दिवसभरात करोनामुक्त झालेल्या १६,७१५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
 
राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ८० हजार ४८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३९ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ९६ हजरा ४४१ जण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
महाराष्ट्रात अजूनही २ लाख ४४ हजार ५२७ अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. मंगळवारी कोरोनाबाधितांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. मंगळवारी राज्यात एकूण १२ हजार ९५८ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १७ हजार १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.