राज्यातील १.६८ कोटी नागरिकांचा दुसरा डोस अजून बाकी
राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. असे असूनही राज्यातील अनेक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. राज्यातील १.६८ कोटी नागरिकांचा दुसरा डोस अजून बाकी असून हे डोस पूर्ण करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान आहे.
राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार , राज्यात सध्या लसीकरण बाकी असणाऱ्या १.६८ कोटी नागरिकांमध्ये १.३७ कोटी नागरिकांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस तर ३१.४५ लाख नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस चुकवलेला आहे. तसेच राज्यातील आत्तापर्यंत एकूण ७७.१६ टक्के लोकसंख्येने दोन्ही डोस घेतलेले आहेत.
सध्या राज्यातील मुंबईमध्ये १०.६३ लाख रूग्णांनी दुसरा डोस घेतलेला नाही, तर पुण्यातील १५.३९ लाख रूग्णांनी दुसरा डोस घेतलेला नाही. ठाण्यात ९.२७ लाख रूग्णांनी दुसरा डोस घेतलेला नाही. याशिवाय नागपूर, सोलापूर, अहमदनगर , नांदेड, बुलढाणा या जिल्ह्यातील देखील लाखों नागरिकांनी दुसरा डोस चुकवलेला आहे.
राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात लसीकरणाला येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हापातळीवर हर घर दस्तक ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.