1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (07:41 IST)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना

The second wave
औरंगाबादमध्ये सध्या कोरोनानं चांगलंच थैमान घातले असून ३० मार्चला तब्बल 43 जणांनी जीव गमावला. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये एका 29 दिवसांच्या बाळाचाही समावेश होता. त्याशिवाय आणखी एक 6 महिन्यांची चिमुकली कोरोनाने दगावली. तर एका 14 वर्षांच्या मुलाचा देखील कोरोनाने बळी गेलाय.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसू लागला आहे. बंगळुरूत दहा वर्षांखालील 472 मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. नजीकच्या भविष्यात हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.