मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (07:22 IST)

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येच्या मोठी घट

The state once
राज्यात मंगळवारी  दिवसभरात ४ हजार २८६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख ६७ हजार ९८८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ७५ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे राज्यात  पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येच्या मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्याचा आकडा सातत्याने वाढताना दिसत होता. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आरोग्य विभागानं  जारी केलेल्या आकडेवारीनुसार  कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढल्यानं राज्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे.
 
राज्यात २ हजार ४३८ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची राज्यातील एकूण रुग्णसंख्या १९ लाख ७१ हजार ५५२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ४० रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळं दगावलेल्या रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या ५० हजार १०१ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५४ टक्के इतका आहे. ५२ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १, ३४, ४३, २२९ चाचण्यांपैकी १९ लाख ७१ हजार ५५२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३० हजार ६९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ ४६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहे.