गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:38 IST)

राज्यात मंगळवारी 2,069 नवीन रुग्णांची नोंद तर 3,616 रुग्ण कोरोनामुक्त

The state registered 2
राज्यात कोरोना  बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत  घट होत आहे. सोमवारी नवीन रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत आली होती. मंगळवारी  यामध्ये थोडी वाढ झाली आहे. रुग्ण आढळून येत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात मंगळवारी  2,069 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,616 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 65 लाख 81 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.36 टक्के आहे. तसेच  43 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 30 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 04 लाख 20 हजार 515 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 81 हजार 677 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 31 हजार 099 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,131 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.