1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (10:19 IST)

कोरोनाचा राज्यात एकही संशयित रुग्ण नाही, ७ जण निरीक्षणाखाली - आरोग्यमंत्री

under seven observations
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सातजण निरीक्षणाखाली आहेत. मात्र आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या मुंबईत दोन जण, तर पुणे येथे चार आणि नाशिक येथे एक जण भरती आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयात निरीक्षणाखाली १३७ जणांना ठेवण्यात आले होते त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १३० जणांना घरी  सोडण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
 
बाधित भागातून आलेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांनी २ आठवडे घरी थांबावे आणि सामाजिक संपर्क टाळावा, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण आणि इटली या १२ देशातील ५३५ विमानांमधील ६४ हजार ९८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३८२ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३१८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.