1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (15:00 IST)

3-4 दिवस लसीकरण बंद राहणार

Vaccination will be discontinued for 3-4 days
दिवाळीमुळे लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद हा कमी असतो. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मात्र अर्धा दिवस लसीकरण सुरू राहणार आहे.
 
दिवाळीनिमित्त महापालिकेला आज गुरुवार (दि. 4) पासून रविवार (दि. 7 नोव्हेंबर) पर्यंत सुट्टी असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय. 
 
शनिवारी व रविवारीही लसीकरण बंद राहणार आहे. दिवाळीनिमित्त अनेक जण परगावी जात असतात. त्यामुळे आणि कामगारांच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण बंद राहणार आहे.
 
मुंबई महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.