शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (08:14 IST)

कोरोनाची लस लवकरच येणार डब्ल्यू एच ओची माहिती

कोरोना COVID 19 विरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे असं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे. “WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने इबोला सारख्या रोगावरही लस शोधण्याचा महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्याच प्रमाणे COVID 19 या व्हायरस विरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे कारण WHO आणि  मित्रांनी गेली अनेक वर्षे इतर करोना व्हायरसच्या लसींवर संशोधन केलं आहे. त्याचमुळे COVID 19 या व्हायरसविरोधातली लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे” असं WHO ने म्हटलं आहे.
 
“जगभरात करोनाचा कहर आहे, जगभरातल्या लाखो लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे याची जाणीव जागतिक आरोग्य संघटनेला आहे. या व्हायरसचा जो परिणाम जगावर आणि इतर आरोग्य सेवांवर तो होतो आहे. त्यावरही जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष आहे” असंही घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.