विनेश फोगटला कोरोनाची लागण

Last Modified शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (08:19 IST)
भारताची स्टार कुस्तीपटू आणि भारताला आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश फोगटला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वत: दिली आहे. तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नाही आहेत. मात्र, तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला आयसोलेट करण्यात आले आहे.
“माझी कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाही आहेत. परंतु मी स्वत: ला आयसोलेट केले आहे. माझ्या कुटुंबाला देखील आयसोलेट करण्यात आले आहे. अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने चाचणी करावी, अशी विनंती केली आहे. प्रत्येकजण सुरक्षित रहा!” असे ट्विट तिने केले आहे.

तब्येत बिघडली म्हणून तिने काही दिवसांपूर्वीच सराव शिबिरातून माघार घेतली होती. नुकतेच तिला खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०१६ मध्ये अर्जुन आणि २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तिने २०१४ आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ आणि ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. २०१४ आणि २०१८ च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..
कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ बेड व आरोग्य सुविधा उपल्बध करण्यासाठी मदत व्हावी या ...

संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन ...

संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करावे : चंद्रकांत पाटील
सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य ...

पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा ...

पुण्यातील कोविड रुग्णालयांसाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध
पुणे जिल्हा प्रशासनाने शहरातील कोविड रुग्णालयासाठी 5900 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध ...

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग
महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ...