शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (08:49 IST)

क्रिकेटवर सट्टा सट्टेबाज तर पकडले सोबत पकडला मुंबईतील पोलिस अधिकारी सुद्धा

क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. पोलिसांकडून सट्टेबाजांना अटकही केली जात आहे. मुंबईतील एका छापेमारीत पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकालाच (पीएसआय) अटक केली आहे. भायखळा पोलीस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यासह दोन जणांना पोलिसांकडून रंगेहाथ पडकले आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत मिखिन शेख आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे यांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांचा जेव्हा छापा पडला तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यावर बेटिंग सुरु होते. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून या सर्आव रोपींना रंगेहाथ पकडल आहे. या पीएसआयला तात्काळ  निलंबित केले आहे. 
 
या प्रकरणात मिकीन शाह नामक सट्टेबाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर फोनवरुन बेटिंग होता, या बद्दल गुप्त माहिती  पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली आणि पथकाने दादरमधील हॉटेलवर धाड टाकली आहे. यात दोन जण सट्टा खेळताना दिसून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी ज्ञानेश्वर खरमाटेही तिथेच होते. पोलिस अधिकारी असून सुद्धा  खरमाटे यांचाही सट्टेबाजांमध्ये समावेश झाला आहे. पोलिसांनी  तिघांना अटक केली आहे. सोबतच 1 लाख 93 हजार 200 रुपये रक्कम, सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत.