शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (22:24 IST)

दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली

South Africa
AUSvsSA ऑस्ट्रेलियाने कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करून आठव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
 
उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेवर ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा विजय ठरला. आतापर्यंत हे संघ एकूण 7 वेळा आमनेसामने आले होते आणि दोन्ही संघ ३-३ वेळा जिंकले होते. मात्र आज ऑस्ट्रेलियाने एकहाती लढतीत वरचढ ठरली.
 
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 212 धावांत ऑलआऊट झाला पण ऑस्ट्रेलियाने वेगवान सुरुवातीनंतर विकेट गमावल्या, त्यामुळे सामना रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावल्या आणि विजयासाठी 48 षटकांची प्रतीक्षा करावी लागली.